शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (12:18 IST)

महिलेच्या तोंडातून काढला साप

snack
Twitter
Snake Pulled Out Of Woman’s Mouth:साप पाहिल्यावर शरीरात खळबळ उडते. तुम्ही कितीही धाडसी असाल, समोर साप दिसला तर मेंदूही काही सेकंद काम करणे थांबवतो, पण झोपेत स्त्रीच्या तोंडात साप घुसला तर काय करू शकतो.
 
रशियातील डेगेस्टनमध्ये झोपेत असताना एखाद्याच्या केसात किंवा कपड्यात साप शिरला तरी आपण विश्वास करू शकतो पण एखादा साप कोणाच्या तोंडात गेला आणि त्याला ते कळतही नाही, तर गोष्ट थोडी विचित्र वाटू शकते पण असाच प्रकार एका महिलेसोबत झाला असून तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
झोपेत असताना तोंडात साप घुसला
ती महिला झोपलेली होती एक मोठा साप तिच्या तोंडात शिरला हे तिला कळलेच नाही. ही बातमी कळताच डॉक्टरांनी त्याला मोठ्या कष्टाने बाहेर काढले. महिलेच्या तोंडातून साप काढल्यानंतर डॉक्टरांनाही भीती वाटली की तो त्यांना चावेल तर नाही. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला बेशुद्ध पडली आहे आणि डॉक्टर तिच्या तोंडात विशेष काठी टाकून सापाला बाहेर काढण्यात गुंतले आहेत. हळुहळू डॉक्टरांनी महिलेच्या तोंडातून साप काढल्यावर डॉक्टरांनाच भीतीने घाम फुटला.
Edited by : Smita Joshi