शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2024 (20:13 IST)

सोन्याची तस्करी करताना अफगाणिस्तानच्या डिप्लोमॅट ला विमानतळावरून अटक

सोन्याची तस्करी करताना अफगाणिस्तानच्या डिप्लोमॅटला मुंबई विमानतळावरून पोलिसांनी पकडले आहे. भारतीय रुपयांत या सोन्याची किंमत सुमारे 19 कोटी रुपये आहे. 
 
अहवालानुसार, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तानच्या कौन्सुल जनरल झाकिया वर्दाक यांना अटक केली आहे. ती दुबईहून सोन्याच्या विटा कपड्यात लपवून भारतात आणत होती. सदर घटना 25 एप्रिल रोजी घडली. आता याची माहिती मिळाली आहे. 

पोलिसांना या बाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी सापाला रचवून पोलिसांना विमानतळावर तैनात केले. 58 वर्षीय अफगाण मुत्सद्दी वारदक 25 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:45 वाजता आपल्या मुलासह अमिरेट्सच्या विमानाने दुबईहून मुंबईला रवाना झाले.विमान तळावर उतरल्यावर आई आणि मुलाने ग्रीन चॅनलचा वापर केला. याचा अर्थ असा की त्यांच्याकडे असा कोणताही माल नाही. ज्याची तपासणी करणे सीमाशुल्काने आवश्यक आहे. डीआयआर च्या अधिकाऱ्यांनी त्यांना एग्झिट गेटवर थांबवले. 

झाकिया आणि तिच्या मुलाकडे 5 ट्रॉली बॅग, एक हॅन्डबॅग, एक स्लिंगबॅग आणि गळ्यातील उशी होती.त्यांच्या सामानावर कोणतेही टॅग नव्हता. अधिकाऱ्यांनी त्यांना सोन्याबाबत विचारल्यावर त्यांनी नकार दिला. 
पोलिसांनी त्यांच्या सामानाची झडती घेतल्यावर सोनं कुठेही आढळून आले नाही. 
 
महिला अधिकाऱ्यांनी त्यांना चौकशीसाठी वेगळ्या खोलीत नेले आणि त्यांची झडती घेतल्यावर जॅकेट, लेगिंग, नी कॅप आणि बेल्ट मध्ये सोनं सापडले. त्यात प्रत्येकी 1 किलो वजनाचे 24 कॅरेट सोन्याचा 24 बार चा समावेश होता. वर्दाक यांच्याकडे सोन्याच्या वैधतेबाबत कोणतीही कागदपत्रे नव्हती.  
अधिकाऱ्यांनी सोनं जप्त केले असून सीमाशुल्क कायदा 1962 अंतर्गत सोन्याचा तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मात्र त्यांच्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे. डिप्लोमॅटिक इम्यूनिटीमुळे त्यांना सध्या अटक होऊ शकली नाही. 
 
ऑक्टोबर 2020 मध्ये अफगाणिस्तान सरकारने मुंबईत कॉन्सुल जनरल झाकिया वर्दाक यांची नियुक्ती केली होती. हे पद भूषवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला मुत्सद्दी होत्या.
 
 Edited By- Priya Dixit