बुधवार, 25 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 15 मे 2017 (15:47 IST)

लष्करी सामर्थ्यात अमेरिका अव्वल, भारत चौथ्या क्रमांकावर

जगात अमेरिका लष्करी सामर्थ्यात सर्वात शक्तिशाली देश असल्याचं समोर आलं आहे. अमेरिका चीन आणि रशियापेक्षा तीनपटीनं स्वतःच्या लष्करावर पैसा खर्च करत असल्याचीही माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ग्लोबल रँकिंगमधून ही गोष्ट उघड झाली आहे. या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारत एकूण 51 मिलियन डॉलर लष्करावर खर्च करतो.

अमेरिका स्वतःच्या संरक्षणासाठी जवळपास 600 बिलियन डॉलर एवढा खर्च करतो. तर रशिया एका वर्षात जवळपास 54 बिलियन डॉलर खर्च करतो, चीन 161 बिलियन डॉलर खर्च करतो. अमेरिकेच्या संरक्षण बजेटमध्ये जवळपास 54 बिलियन डॉलरची वाढ झाली आहे. इसिसचा खतरा लक्षात घेता ट्रम्प यांनी संरक्षण बजेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्लोबल रँकिंगच्या यादीत जवळपास 106 देशांचा समावेश आहे. ज्यात अनेक घटकांचा विचार करण्यात आला आहे. यात संरक्षण बजेट, लष्करी सामर्थ्य आणि शस्त्रास्त्रांच्या संख्येवर भर देण्यात आले आहे. भारताकडे 4426 टँक्स, 3 हेलिकॉप्टर केरिअर, 2102 एअरक्राफ्ट,  295 नौदलाचं सामर्थ्य आणि 1325000 जवानांची संख्या आहे.