सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 1 फेब्रुवारी 2017 (17:44 IST)

ऑस्ट्रियात सत्ताधारी आघाडीची बुरख्यावर बंदीला सहमती

ऑस्ट्रियातील सत्ताधारी आघाडीने  न्यायालय आणि शाळा यांसारख्या सार्वजनिक जागी संपूर्ण चेहरा झाकणाऱ्या बुरख्यावर बंदी घालण्याबाबत  सहमती दिली आहे. सरकारी अधिकाऱ्यांकडून डोके झाकणे आणि अन्य धार्मिक प्रतीकांवरही बंदी घालण्याचा विचार सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे.
 
देशातील उजव्या गटाच्या फ्रीडम पार्टी या पक्षाला रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे मानले जात आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फ्रीडम पार्टीला अत्यंत थोड्या अंतराने पराभव पत्करावा लागला होता. या संबंधात आघाडीने केवळ दोन ओळींचे एक निवेदन जारी केले आहे. “आम्ही खुल्या समाजासाठी कटिबद्ध आहोत. सार्वजनिक स्थानी पूर्ण चेहरा झाकणारा नकाब याला आळा घालतो. त्यामुळे याच्यावर बंदी घालण्यात येईल,” असे या निवेदनात म्हटले आहे.यूरोपातील अनेक देशांनी अशा प्रकारचे निर्बंध घातले आहेत, मात्र ऑस्ट्रियाने उचललेले हे ‘प्रतीकात्मक’ पाऊल असल्याचे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. संसदेत मंजुरी मिळाल्यानंतर हा निर्बंध अंमलात येईल. यापूर्वी फ्रान्स आणि बेल्जियमने 2011 साली बुरख्यावर बंदी घातली होती, तसेच नेदरलँडच्या संसदेत यावर चर्चा सुरू आहे.