ट्रम्प यांच्या कठोरतेनंतर कोलंबियाचा यू-टर्न नागरिकांना अध्यक्षीय विमानानेआणणार
अमेरिकेच्या कठोरतेनंतर कोलंबिया सरकारने यू-टर्न घेत अमेरिकेतून हद्दपार केलेल्या आपल्या नागरिकांना परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोलंबिया सरकार आता आपल्या निर्वासित नागरिकांना होंडुरासमधून आणण्यासाठी राष्ट्रपतींचे विमान पाठवून सन्मानपूर्वक परत आणणार आहे. कोलंबियाने यापूर्वी आपल्या निर्वासित नागरिकांना परत घेण्यास नकार दिला होता. यामुळे संतप्त झालेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियावर शुल्क लागू करण्याची आणि इतर सूडबुद्धीने पावले उचलण्याची घोषणा केली होती. यामुळे कोलंबिया सरकारला आपला निर्णय बदलावा लागल्याचे मानले जात आहे.
कोलंबिया सरकारने अमेरिकन विमानांवर बंदी घातल्याने डोनाल्ड ट्रम्प संतप्त झाले आणि त्यांनी कोलंबियावर 25 टक्के आपत्कालीन शुल्क लागू करण्याची घोषणा केली. तसेच कोलंबियातील लोकांवर अमेरिकेत येण्यावर बंदी घालण्यात आली होती. एवढेच नाही तर ट्रम्प यांनी कोलंबियातील अधिकाऱ्यांच्या व्हिसावरही बंदी घातली होती.
कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी हद्दपार केलेल्या नागरिकांना सन्मानाने परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. कोलंबिया सरकारने अमेरिकेतून निर्वासित नागरिकांना परत आणण्यासाठी एक विशेष टीम देखील तयार केली आहे, जी संपूर्ण मोहिमेची देखरेख करेल.
Edited By - Priya Dixit