1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 30 जून 2024 (00:14 IST)

जो बायडन यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मागे घ्यायला लागू शकते का?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठीचा पहिलं प्रेसिडेंशियल डिबेट 27 जूनला आटोपला आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या दृष्टीनं हे डिबेट फारसं चांगलं ठरलं नाही.गुरुवारी (27 जून) राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांमध्ये डिबेट झालं होतं. त्यामध्ये दोन्ही उमेदवारांनी आपापली बाजू मांडली. त्यात बायडन यांचं पहिलं उद्दिष्ट त्यांच्या वयाबद्दल निर्माण झालेल्या शंका दूर करणं हे होतं. मात्र, प्रत्यक्षात या डिबेटनंतर बायडन यांच्या वयाचा मुद्दा आणखी ऐरणीवर आला आहे.
 
डेमोक्रॅटिक पक्षाच्या काही नेत्यांनी आणि पक्षाच्या काही लोकांनी कथितरित्या सीएनएनच्या पत्रकारांना संदेश पाठवला की, 81 वर्षांचे बायडन कदाचित आपलं पद सोडतील.
काही लोकांनी बायडन यांची व्हाईट हाऊसला परतण्याची शक्यता आणि राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याबाबत सार्वजनिकरित्या असलेल्या चिंतेचा मुद्दा उपस्थित केला.
 
तेव्हापासूनच बायडन आता राष्ट्राध्यक्षपदाची आपली उमेदवारी मागे घेतील का? जर असं झालं तर याचा काय परिणाम होईल? आणि त्यांच्या जागी कोण राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार असेल? हे प्रश्न निर्माण झाले आहेत.
 
बायडन उमेदवारी मागे घेऊ शकतात का?
डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराच्या अधिकृत निवडीची घोषणा 19-22 ऑगस्टला शिकागोमध्ये होणाऱ्या डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेंशन (डीएनसी) मध्ये म्हणजेच डेमोक्रॅटिक पक्षाच्या परिषदेत केली जाणार आहे.
 
तिथे राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराला प्रतिनिधींचा (डेलीगेट्स) बहुमतानं पाठिंबा मिळवावा लागेल. तिथे औपचारिकपणे राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराची निवड होईल.
 
प्रत्येक राज्याच्या प्राथमिक निवडणूक निकालांच्या आधारावर त्या प्रमाणात उमेदवारांना प्रतिनिधी दिले जातात. यावर्षी बायडन यांनी चार हजार प्रतिनिधींपैकी जवळपास 99 टक्के प्रतिनिधी जिंकले आहेत.
 
डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेंशनच्या नियमांनुसार, हे प्रतिनिधी बायडन यांच्यासाठी कटिबद्ध आहेत आणि बायडन यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यास बांधील आहेत.
मात्र, जर बायडन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडले, तर मग राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी कन्व्हेंशन सर्वांना खुलं केलं जाईल. बायडन यांना किंवा पक्षातील इतर कोणालाही आपला उत्तराधिकारी निवडण्याची कोणतीही तरतूद नाही.
 
या परिस्थितीत अशी शक्यता आहे की, बायडन यांचा आपल्या प्रतिनिधींवर प्रभाव पडू शकतो. मात्र, शेवटी प्रतिनिधींना त्यांचा निर्णय घेता येणार आहे.
 
अशावेळी डेमोक्रॅटिक पक्षातील जे लोक उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, त्यांच्यात उघड सामना सुरू होईल.
 
इथं ही बाब लक्षात घेतली पाहिजे की, आतापर्यंत बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची आपली उमेदवारी मागे घेण्याचा कोणताही संकेत दिलेला नाही.
उमेदवारी मागे घेण्याची वेळ बायडन यांच्यावर येऊ शकते का?
उमेदवारी मागे घेण्याची वेळ आल्यास ती बाब लोकांना आवडणार नाही.
 
आधुनिक राजकीय काळात कोणत्याही मोठ्या राष्ट्रीय पक्षानं कधीही उमेदवार बदलण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि या प्रकारचं गंभीर पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचेही पुरावे नाहीत.
अर्थात डीएनसीच्या नियमांमध्ये काही लहानमोठे दोष आहेत. या आधारे सैद्धांतिकरित्या बायडन यांना निवडणुकीच्या रिंगणाबाहेर करणं शक्य होऊ शकतं.
 
ज्यांनी निवडून दिले आहे त्यांच्या भावना विवेकबुद्धीने मांडण्याची परवानगी प्रतिनिधींना नियमानुसार आहे. याचा अर्थ असा की जर संपूर्ण देशात डेमोक्रॅटिक मतदारांना मोठ्या संख्येनं वाटलं की बायडन हे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून नकोत तर प्रतिनिधी इतर व्यक्तीला उमेदवार म्हणून पुढे आणू शकतात.
 
कमला हॅरिस बायडन यांची जागा घेऊ शकतात का?
बायडन यांनी जर आपलं पद आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळातच सोडलं तर उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस त्यांची जागा घेतील.
 
मात्र, जर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडन यांनी स्वत:ची उमेदवारी मागे घेतली तर हा नियम लागू होणार नाही. म्हणजेच हॅरिस या आपोआप उमेदवार ठरू शकणार नाहीत. उपराष्ट्राध्यक्षांना खुल्या कनव्हेंशनमध्ये राष्टाध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी थेट पुढे आणण्याची कोणतीही व्यवस्था किंवा तरतूद नाही.
 
त्याऐवजी हॅरिस यांना इतर उमेदवारांप्रमाणेच प्रतिनिधींचा बहुमतानं पाठिंबा मिळवावा लागेल.
 
कमला हॅरिस आधीच डेमोक्रॅटिक पक्षात वरच्या पदावर आहेत. साहजिकच त्यांना नक्कीच पसंती दिली जाऊ शकते. मात्र, अमेरिकन जनतेमध्ये त्यांची फारशी लोकप्रियता नसल्यामुळे ही शक्यता धूसर होते.
 
एका सर्वेक्षणानुसार, त्यांच्याबद्दल जनतेची एकूण नापसंती आता बायडन किंवा ट्रम्प यांच्यापेक्षा कमी आहे.
 
बायडन यांची जागा कोण घेऊ शकतं?
यावेळच्या निवडणूक प्रक्रियेत अनेक डेमोक्रॅटिक उमेदवारांनी बायडन यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये मिन्नेसोटाचे प्रतिनिधी डीन फिलिप्स आणि लेखक मॅरियाना विलियम्सन याचंसुद्धा नाव आहे.
 
या दोघांनाही खूप प्रयत्न केले होते. मात्र या दोघांपैकी कोणाचीही राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी निवड केली जाण्याची शक्यता फारच कमी आहे.
 
असेही अंदाज वर्तवले जात आहेत की कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसम किंवा मिशिगनचे गव्हर्नर ग्रेचेन व्हिटमर यांचा विचार केला जाऊ शकतो.
मात्र, या दोघांनीही बायडन यांची जागा घेण्यात कोणताही रस दाखवलेला नाही.
 
न्यूसम यांनी गुरूवारी अटलांटामध्ये म्हटलं होतं की, "मी कधीही राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याकडे पाठ फिरवणार नाही."
 
ते म्हणाले, "मी त्यांच्यासोबत खूप वेळ घालवला आहे आणि मला माहित आहे की त्यांनी मागील साडे तीन वर्षात काय साध्य केलं आहे. मला त्यांची क्षमता आणि त्यांचं व्हिजन माहित आहे. मला कोणतीही भीती वाटत नाही."
 
Published By- Priya Dixit