शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

जिन पिण्यासाठी मिळणार 17.4 लाख रूपये

लंडन- कामाचे समाधान या बाबत आपण नेहमी चर्चा करत असतो. ज्या कामातून आपल्याला समाधान मिळते तेच काम आपण करावे असा सल्ला आपणाला बरेच लोक देत असतात. पण प्रत्येकाला ही संधी मिळतेच असे नाही. परंतू, जर तुम्हाला तुमचा आत्मा तृप्त करणारी नोकरी मिळाली तर? आणि त्याचे तुम्हाला 20,000 युरो (17.4 लाख रूपये) मिळाले तर? 
 
अशा आत्मा तृप्त करणार्‍या नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या नोकरीत कामाचे स्वरूप देखील खूप लोकांच्या आवडीचे आहे. यात तुम्ही फक्त जगभरात फिरून जिनची चव चाखायची आहे. आय लव्ह जिन या लंडनमधील ऑनलाइन जिन अॅड टॉनिक क्लबच्या वेबसाईटसाठी जगभर फिरून जिन कंपनींना भेटी द्यायच्या आणि त्याची चव चाखायची. यासाठी ती कंपनी तुम्हाला तब्बल 20,000 युरो देणार आहे. ही नोकरी पार्ट टाइम आहे हे विशेष.
 
जर एखाद्या मद्य प्रेमीला ही नोकरी मिळाली तर तो कधीही कामाचे समाधान या विषयावर चर्चाच करणार नाही म्हणूनच या नोकरीसाठी तब्बल 5,000 अर्ज आलेत.