सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

रशियाच्या समुद्रात सापडला महाकाय मासा

साखलिन- जगभरात रोज नवीन घडणार्‍या घटना समोर येत असतात, त्या पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा आश्यर्च वाटते. अशीच एक आश्चर्यकारक घटना म्हणजे रशियाच्या समुद्रात तब्बल एक टनाचा मासा आढळला आहे. या माशाची चर्चा सर्वत्र होत आहेच. मात्र, याचे फोटो गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियात मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत.
 
पश्चिम रशियातील साखलिन येथील समुद्रात मच्छीमारांच्या जाळ्यात जवळपास 1,100 किलो इतक्या वजनाचा सनफिश या जातीचा मासा सापडला. जगभरातील आतापर्यंत सापडलेला हा सर्वाधिक मोठा मासा असल्याचे सागंण्यात येत आहे. तसेच हा मासा पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. येथील एका मच्छीमाराने सांगितले की आतापर्यत अनेक मासे पकडले. मात्र समुद्रात इतका मोठा मासा असतो, याबाबत मला काहीच माहिती नव्हती. समुद्रातील काही डॉल्फीन माशांचा आकार 1.5 मीटरपर्यत असल्याचे माहीत आहे. मात्र इतका मोठा मासा समुद्रात असतो ते आता प्रत्यक्षात पाहिल्यावर समजले असेही त्या मच्छीमाराने सांगितले.