शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 जुलै 2018 (16:06 IST)

गुहेत अडकलेली मुले झाली भावनिक लिहिले पत्र

थायलंडमधील गुहेत दोन आठवड्यांपासून अडकलेल्या फुटबॉल संघातील मुलांनी लिहलेले पत्र मदत यंत्रणांच्या हाती लागले. थायलंडच्या नेव्ही सीलच्या फेसबुक पेजवर हे पत्र प्रसिद्ध केल असून, एका मुलाने हे पत्र आपल्या आई-वडिलांना उद्देशून लिहले आहे. त्यात तो म्हणतो की आई, बाबा माझी काळजी नका करु मी सुखरुप आहे. इथून बाहेर पडल्यानंतर मला फ्राईड चिकन खायला घेऊन जा. मी तुमच्यावर फार प्रेम करतो. तर दुसऱ्या एका संदेशात मुलाने म्हटले आहे की, आई-बाबा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मला पोर्क शॅबू खावेसे वाटत आहे. मुले लहान आहेत. या सर्व प्रकारात या मुलांच्या फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकांनी पालकांची जाहीर माफी मागितली आहे. त्यात तो म्हणतो आहे की सर्व मुले सुखरुप आहेत, मी त्यांची काळजी घेईनच. पण सर्व पालकांची मी माफी मागतो’.  थायलंडमधील चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत बेपत्ता झालेल्या फुटबॉल संघाचा अखेर जवळपास नऊ दिवसांनी शोध लागला होता. थाय फुटबॉल संघातील ११ ते १६ वयोगटातील एकूण १२ मुले आणि त्यांचे प्रशिक्षक या गुहेत अडकले आहेत. संपूर्ण जगातून त्यांना वाचविण्यासाठी मदत मागितली होती.