शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 17 मे 2020 (08:26 IST)

युरोपातला 'हा' देश झाला कोरोनामुक्त

युरोपमधील स्लोवेनिया देश कोरोना मुक्त झाल्याची घोषणा युरोपातील अधिकाऱ्यांनी केली आहे. युरोपीय संघाचे सदस्य स्लोवेनिया सरकारने देशात कोरोना नियंत्रणात आल्याची घोषणा केली आहे.
 
यावेळी युरोपचे पंतप्रधान जनेझ जानसा  म्हणाले की, 'यूरोपातील सद्य स्थितीकडे पाहिले तर स्लोवेनिया देश अधिक सुरक्षित आहे. गेल्या १४ दिवसांची कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता स्लोवेनिया कोरोनामुक्त घोषित करण्यात आले आहे.
 
स्लोवेनिया देशातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या १४ दिवसांपासून याठिकाणी ७ पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळलेले नाहीत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे लक्षात येताच लादण्यात आलेले काही नियम शिथिल करण्यात आले आहेत.