दारू पाजून चार वर्षांच्या नातीची आजीने केली नृशंस हत्या
अमेरिकेतील लुइसियाना मध्ये चार वर्षांच्या चिमुरडीची दारू पाजून नृशंस हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत्यूप्रकरणी आजी आणि आईविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षा म्हणून मुलीला जबरदस्तीने दारूची अर्धी बाटली दिल्याचा आरोप आजीवर आहे, ज्यामुळे तिची प्रकृती बिघडली आणि नंतर तिचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार घडत असताना मुलीची आई शांतपणे पाहत राहिली.
लुइसियानामध्ये राहणाऱ्या 53 वर्षीय आरोपी महिलेचे नाव रोक्सेन (मुलीची आजी) आहे. रोक्सेनवर तिच्या चार वर्षांच्या नातीला जबरदस्तीने दारूची अर्धी बाटली प्यायला लावल्याचा आरोप आहे, त्यानंतर मुलीचा मृत्यू झाला.
मुलीची आई, काझा (28) शांतपणे रोक्सनचे हे भयानक कृत्य पाहत उभी होती. यामुळे काजाहवर रोक्सनसह खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे.या घटनेच्या तपासणीत मुलीच्या रक्तातील अल्कोहोलची पातळी कायदेशीर मर्यादेच्या आठ पट होती.
माहिती मिळताच पोलीस रोक्सनच्या घरी रोक्सनच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. चौकशी केली असता, मुलीच्या भावंडांनी सांगितले की, आजीला दारू पिण्याची सवय आहे आणि मयत मुलीने चुकीने आजीच्या दारूच्या बाटलीतून दारूचा घोट घेतल्याने आजी रागावली होती. यामुळे रागावलेल्या आरोपी आजी रोक्सेनने मुलीला शिक्षा म्हणून जमिनीवर गुडघे टेकण्यास भाग पाडले आणि बाटलीतील अर्धी दारू संपवली. मुलीला जबरदस्तीने दारू दिल्यानंतर तिच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण वाढले आणि तिचा मृत्यू झाला