शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गिलगिट , बुधवार, 17 मे 2017 (11:47 IST)

यांचे आयुष्यमान आहे दीडशे वर्षे

बदलत जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे माणसाचे आयुष्य कमी होत चालले आहे. खाण्यातील बदलामुळे रोगांचेही प्रमाण वाढले आहे, पण एक अशी जमात आहे जी या सर्व बाबींपासून दूर आहे. पाकव्याप्त काश्मिरातील गिलगिट आणि आल्टिस्तान या डोंगरी भागात राहणारा हुंजा हा समुदाय दीर्घायुष्यासाठी ओळखला जातो. हिमालयाच्या डोंगररांगात राहणारा हा समुदाय भारताच्या उत्तर भागात राहतो. 
 
येथून पुढे भारत, पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तानची सीमा जवळजवळ आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणारे आणि निसर्गाशी मिळून मिसळून राहणारे हे लक कॅन्सर सारख्या रोगांपासून कोसोदूर आहेत.