रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 (12:17 IST)

अंजू पुन्हा भारतात परतणार

anju
जुलै महिन्यात फेसबुक मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेली अंजू मीना आता भारतात परतणार आहे. बातमी अशी आहे की ती आपल्या मुलांना खूप मिस करत आहे आणि त्यांना भेटण्यासाठीच घरी परतणार आहे. अंजूचा पती नसरुल्ला याने सांगितले की, ती पुढील महिन्यापर्यंत भारतात परतणार आहे.
 
पीटीआयला दिलेल्या फोन मुलाखतीत अंजूचा पती नसरुल्लाहने खुलासा केला की ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि तिला आपल्या मुलांची खूप आठवण येते. भारतात परत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगितले. अंजूचे पहिले लग्न राजस्थानमधील रहिवासी अरविंदसोबत झाले होते. याच विवाहातून अंजूला 15 वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे.
 
नसरुल्लाह म्हणाले की अंजूचे मानसिक आरोग्य बिघडू नये अशी आपली इच्छा आहे त्यामुळे तिने आपल्या मुलांना भेटायला तिच्या देशात गेले तर बरे होईल. अंजू पाकिस्तानात कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून परत येईल, ज्याला एक महिना लागू शकतो. नसरुल्लाहने सांगितले की व्हिसा मिळाल्यास तो भारतातही येईल.
 
34 वर्षीय अंजू इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर तिला आता फातिमा म्हणून ओळखले जाते. तिने 25 जुलै रोजी तिचा 29 वर्षीय मित्र नसरुल्लासोबत विवाह केला. नसरुल्लाह यांचे घर खैबर पख्तूनख्वामधील अप्पर दीर ​​जिल्ह्यात आहे. 2019 मध्ये दोघांची फेसबुकवर मैत्री झाली.