बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

जपानच्या कंपन्यांमध्ये 3 दिवसांचच आठवडा

टोकियो- जपानमधील अनेक कंपन्यांनी आठवड्यात तीन दिवस काम करण्याचे धोरण लागू केले आहे. कमी कारगरांच्या समस्येचा सामना करत असलेल्या जपानमधील कंपन्यांनी कामगारांना आकर्षित करण्यासाठी या सुविधेची सुरूवात केली आहे.
 
कर्मचार्‍यांना कुटुंबीयांना आणि मुलांना जास्तीत जास्त वेळ देता यावा हा या मागचा उद्देश आहे. कर्मचारी उर्वरित वेळते दुसरे काम करून जास्त उत्पन्न मिळवू शकतील यासाठी काही कंपन्यांनी हे धोरण लागू केले आहे. तसेच ते कर्मचारी सध्याची नोकरी सोडण्याचाही विचार करणार नाहीत.