शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2025
  3. दिल्ली विधानसभा निवडणूक 2025
Written By
Last Updated : बुधवार, 19 फेब्रुवारी 2025 (21:59 IST)

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Marathi Breaking News Live Today: दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल रेखा गुप्ता यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आणि विधिमंडळ पक्षाचे आभार मानले आहे. रेखा गुप्ता पुढे म्हणाल्या, "माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाची आणि विधिमंडळ पक्षाची आभारी आहे. दिल्लीच्या विकासाची माझी जबाबदारी पार पाडण्यास मी तयार आहे."

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. 19फेब्रुवारी रोजी मध्यरात्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथे आतषबाजी आणि प्रकाश योजनेचे आयोजन करण्यात आले होते. सविस्तर वाचा... 

नागपूरहून छत्तीसगडला दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका नवविवाहित जोडप्याला मागून येणाऱ्या अज्ञात महिंद्रा पिकअप वाहनाने धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाले. मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चिखली फाट्यावर हा अपघात झाला सविस्तर वाचा... 

नागपुरात फसवणुकीचे नवीन प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तींने घरमालकाच्या मालमत्तेची रंगीत छायाप्रत कागदपत्रे एका वित्त कंपनीला देऊन आणि स्वतःचे घर असल्याचा दावा करून गहाण ठेवून वित्त कंपनीकडून 74 लाखांचे गृहकर्ज घेतल्याचा प्रकार घडला आहे सविस्तर वाचा... 

देशात महिला आणि मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना घडतात.आता मुली आणि महिला कोणत्याही क्षेत्रात सुरक्षित नाही जरी स्वतःचे घर असले तरी. पण आताच्या काळात महिला, मुलींसह पाळीव प्राणी देखील सुरक्षित नाही. एका तरुणाने भटक्या प्राण्यांसोबत गैरवर्तन करण्याचे वृत्त समोर आले आहे सविस्तर वाचा... 

अकोल्यातील बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचे प्रकरण सातत्याने जोर धरत आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी पुन्हा एकदा अकोला पोलिसांशी संवाद साधला आणि तपासाशी संबंधित महत्त्वाची माहिती दिली. अकोल्यातील रामदासपेठ पोलिस ठाणे गाठून त्यांनी बोगस कागदपत्रांशी संबंधित काही कागदपत्रे अधिकाऱ्यांना दिली. सविस्तर वाचा... 

मंगळवारी एका नवीन रुग्णाची नोंद झाल्याने महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या संशयित आणि पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या 211 वर पोहोचली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की यापैकी 183 रुग्णांमध्ये दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची पुष्टी झाली आहे.सविस्तर वाचा... 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर आयोजित 'पालना अनुष्ठान'सह विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. सविस्तर वाचा... 

छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह माहिती देण्याविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विकिपीडियाला आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचे आदेश दिले आहे. विकिपीडियावर छत्रपती संभाजी महारांच्या बाबत आक्षेपार्ह मजकूर टाकण्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून आक्षेपार्ह मजकूर टाकण्याऱ्यांवर कारवाई करण्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. . सविस्तर वाचा...

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे. आव्हाड यांचे दोन समर्थक अभिजित पवार आणि हेमंत काणी यांनी शरद पवार पक्षाला राम राम करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सविस्तर वाचा... 
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यातील काही निर्णयांमुळे सांगली, सोलापूर आणि जळगाव येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मंत्रिमंडळाने 1,594  कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली. या योजनेद्वारे दुष्काळग्रस्त भागातील 1 लाख 8 हजार 197 हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा मिळणार आहे. सविस्तर वाचा... 

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वादाच्या बातम्या दररोज समोर येतात. आता एकनाथ शिंदे यांनी कोणतेही मतभेद नाकारले आहे. त्यांनी म्हटले आहे की महायुती सरकारमध्ये सर्व काही ठीक आहे आणि शीतयुद्ध नाही. सविस्तर वाचा 

आगामी 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होणार आहे. या संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार का हे पाहावे लागणार आहे. यंदा आगामी साहित्य संमेलनासाठी 7 ठिकाणांहून निमंत्रण प्राप्त झाली असून साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने सादर केलेल्या अहवालावर साहित्य महामंडळाच्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यालयात बैठक झाली त्यात आगामी साहित्य संमेलन दिल्लीत होण्याचा निर्णय घेण्यात आला. सविस्तर वाचा... 
 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीतील ६५ बेकायदेशीर इमारतींमधील घर खरेदीदारांना सुरक्षिततेचे आश्वासन दिले आहे. त्यांनी बांधकाम व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आणि गरज पडल्यास सरकार सर्वोच्च न्यायालयात जाईल असे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या विधानामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा 

पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी हिमायत बेगला हलवण्याबाबत कोणताही आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. २०१३ मध्ये विशेष न्यायालयाने बेगला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्याला UAPA कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली दोषी ठरवण्यात आले होते. सविस्तर वाचा 

११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी माजी लेफ्टनंट कर्नलला सुनावण्यात आलेली पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. तसेच कोर्ट मार्शलच्या आदेशानुसार ही शिक्षा सुनावण्यात आली. निर्णयात, न्यायालयाने हे मान्य केले आहे की अल्पवयीन मुलाला वाईट स्पर्शाची  जाणीव होती. सविस्तर वाचा

आज संध्याकाळी ७ वाजता दिल्ली भाजप कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.
दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी माहिती दिली आहे की, आज संध्याकाळी ७ वाजता पक्षाचे दोन केंद्रीय निरीक्षक विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी दिल्लीत येतील आणि ते मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करतील.
-भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आरएसएस कार्यालयात पोहोचले आहे. 
-भाजप नेते दुष्यंत कुमार गौतम म्हणाले की, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबद्दल आमदार आपापसात निर्णय घेतील आणि संसदीय पक्ष विधिमंडळ पक्षाच्या निर्णयाला मान्यता देईल. आपल्याला अजून १-२ तास वाट पहावी लागेल.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांना १० दिवसांहून अधिक काळ लोटला आहे आणि भाजप आज मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणार आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव अंतिम केले जाईल. सविस्तर वाचा 

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण आदर आणि सन्मानाने साजरी केली जात आहे. पण, यावेळी राहुल गांधींच्या ट्विटवरून वाद सुरू झाला आहे. सविस्तर वाचा 

दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्र्यांचे नाव लवकरच जाहीर केले जाईल. याआधी भाजप कार्यालयाबाहेर उत्साहाचे वातावरण असते आणि ढोल वाजवले जात असतात.
महाराष्ट्र भाजप नेते प्रसाद लाड यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे आणि राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा 

दिल्ली भाजपचे निवडणूक प्रभारी बैजयंत पांडा आणि आमदार मनजिंदर सिंग सिरसा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी दिल्ली भाजप कार्यालयात पोहोचले.
मंगळवारी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. देशमुख कुटुंबाला भेटल्यानंतर, सुप्रिया सुळे यांनी स्वतः लढाई लढण्याची शपथ घेतली. सविस्तर वाचा 

दिल्ली विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी भाजप नेते आणि पक्षाचे केंद्रीय निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि ओम प्रकाश धनकर दिल्ली भाजप कार्यालयात पोहोचले.
सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी कन्नड आमदार हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयाच्या आदेशावरून नागपूरच्या सोनेगाव पोलिसांनी अटक केली. सविस्तर वाचा 

-भाजप कार्यालयात येणाऱ्या आमदारांचे कपाळावर टिळा लावून, त्यांना गुलाबाचे फूल देऊन आणि पगडी घालून स्वागत केले जात आहे. यानंतर सर्व आमदार विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आत जात आहे.
-भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी भाजप खासदार बांसुरी स्वराज पक्ष कार्यालयात पोहोचल्या.
-दिल्ली भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी पक्ष कार्यालयात पोहोचल्यावर, भाजप नेते रामवीर सिंह बिधुरी म्हणाले, 'पुढील एका तासात तुम्हाला सर्व माहिती मिळेल.'

दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले सर्व भाजप आमदार पक्ष कार्यालयात पोहोचले आहे. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू झाली आहे आणि लवकरच दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केले जाईल.
भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे नाव अंतिम करण्यात आले असून रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री होतील आणि प्रवेश वर्मा उपमुख्यमंत्री होतील.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचे निकाल ११ दिवसांपूर्वी आले. आज बुधवारी, अखेर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यात आली. भारतीय जनता पक्षाने रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. सविस्तर वाचा 

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सविस्तर वाचा 

रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. २० फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानावर रेखा गुप्ता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. अशी माहिती समोर आली आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. रेखा गुप्ता यांच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा