शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

फर्स्ट लेडी बनण्याच्या 2 दिवस आधी खून

आफ्रिकी देश लेसोथोचे नवनिर्वाचित पंतप्रधान थॉमस थाबाने हे पदाची सुत्रे स्वीकारणार आहेत. याच्या केवळ दोन दिवस आधी त्यांची पहिली पत्नी लिपोलेला थाबा यांची कोणी तरी गोळी घालून हत्या केली. या घटनेने संपूर्ण देश खिन्न आहे.
 
थॉमस सध्या आपल्या तिसर्‍या पत्नीसोबत राहतात. लिपोलेला यांनी उच्च न्यायालयाकडून हा आदेश प्राप्त केला. त्यांना फर्स्ट लेडीच्या सर्व सुविधा मिळणार होत्या. तिसर्‍या पत्नीला त्या सुविधा न देण्याचेही आदेशात म्हटले होते. थॉमस आणि लिपोलेला 2012 पासून विभक्त राहतात. दोघांनी न्यायालयात घटस्फोटासाठी खटला दाखले काला होता. मात्र, अद्यापही त्यांना घटस्फोट मिळू शकला नाही. 
 
गेल्या आठवड्यात लिपोलेला यांच्या घराबाहेर त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला होता. पती थॉमस यांना त्यांनी फर्स्ट लेडी होणे मंजूर नव्हते. लिपोलेलो यांनी आपल्या पतीला विरोध केला. त्यांनी ते पद मिळवले. राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षाची पत्नीच फर्स्ट लेडी होण्याचा सर्वत्र रिवाज आहे. मात्र, लेसोथो मध्ये घटनात्मक राजेशाही असल्याने किंग लेत्सीची तृतीय पत्नी अन्ना मोत्सोएनेंग महाराणी आहेत.