नेपाळ : पंतप्रधान 'प्रचंड' यांचा तडकाफडकी राजीनामा
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी पंतप्रधानपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. प्रसारमाध्यमातून देशाला संबोधून भाषण केल्यानंतर प्रचंड यांनी पदाचा राजीनामा विद्यादेवी भंडारी यांच्याकडे राजीनामा सोपवला. प्रचंड हे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्यांना नेपाळी काँग्रेसने सशर्त पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यासाठी झालेल्या करारानुसार प्रचंड यांनी ठराविक काळानंतर पद सोडणे अपेक्षित होते. मात्र मंगळवारी प्रचंड यांनी राजीनामा देणे टाळल्याने नेपाळमध्ये राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर नेपाळी काँग्रेससोबत झालेल्य कराराचे पालन करत प्रचंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला.