मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2023 (14:40 IST)

Russia Earthquake:रशियात 6.9 तीव्रतेचा भूकंप, पापुआ न्यू गिनी, चीन आणि तिबेटमध्येही हादरे

Russia Earthquake: पापुआ न्यू गिनी, चीन आणि तिबेटमध्ये भूकंपानंतर आता रशियातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सोमवारी उत्तर किनारपट्टी भागात  6.9 तीव्रतेचा भूकंप जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू रशियाच्या पॅसिफिक किनाऱ्यापासून 100 किलोमीटर खाली होता. भूकंपाच्या या तीव्रतेमुळे त्सुनामीची शक्यता वाढते. आपत्कालीन बाबींवर लक्ष ठेवणाऱ्या रशियन मंत्रालयाने सांगितले की, भूकंपानंतर सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.
 
स्थानिक लोकांनी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. भूकंपाच्या धक्क्यामुळे किराणा दुकानातील सामान विखुरल्याचे दिसत आहे. दुकानातील जवळपास माल जमिनीवर आला आहे.  घराच्या आत रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण घर हादरत आहे.
 
कामचटका येथील किराणा दुकानात विखुरलेले सामान
रशियातील कामचटका येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. येथून समोर आलेल्या किराणा दुकानाच्या व्हिडिओमध्ये माल जमिनीवर कसा विखुरलेला दिसतो. किराणा दुकानदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
 
पापुआ न्यू गिनीमध्ये 7.0 रिश्टर स्केलचा भूकंप
यापूर्वी पापुआ न्यू गिनीमध्ये 7.0 तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनंतर येथे त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
Edited by : Smita Joshi