मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 फेब्रुवारी 2019 (08:46 IST)

पाककडून सौदीचे राजपूत्रला सोन्याने मढवलेली मशीनगन भेट

सौदीचे राजपूत्र महंमद बिन सलमान पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची भेट रद्द करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पाकिस्तानने हा दौरा यशस्वी केला होता. यावेळी पाकिस्तानच्या खासदारांनी राजपूत्र महंमद बिन सलमान यांना सोन्याने मढवलेली मशीनगन भेट म्हणून दिली आहे.  
 
या दौऱ्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वत: राजपूत्र महंमद बिन सलमान यांच्या गाडीचे सारथ्य केले होते. तसेच पाकिस्तानकडून त्यांना 'निशान ए पाकिस्तान' हा पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले. एवढेच नव्हे तर राजपूत्र महंमद बिन सलमान यांच्या दिमतीला लढाऊ विमान देण्यात आले होते. पाकिस्तानात आल्यावर २१ तोफांची सलामी आणि गार्ड ऑफ ऑनर देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.