बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (10:47 IST)

तो मृतदेह बेपत्ता भारतीय मुलीचा आहे, अमेरिकी पोलिसांनी केली पुष्टी

अमेरिकी पोलिसांनी मंगळवारी सांगितले की दोन आठवड्यापूर्वी बेपत्ता तीन वर्षाची भारतीय मुलगी शेरीन मैथ्यूजचा मृत्यू झाला आहे. तिच्या वडिलांनी हे स्वीकार केले आहे की दूध पिताना तिचा गळा अवरुद्ध झाला होता.  
 
पोलिसांनी मृतदेहाची पुष्टी केली  
पोलिसांनी सांगितले की चिकित्सा तपासणी अधिकार्‍यांनी मृतदेहाच्या पुष्टीसाठी डेंटल रिकार्ड तपासला आणि पुष्टी केली की शव बेपत्ता मुलीचाच आहे. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.  
 
पोलिसांनी केले वडिलांना अटक  
रिचर्डसन पोलिस विभागाने मुलीच्या वडिलांना अटक केली केली आहे. त्यासाठी  जमानतची राशी 10 लाख डॉलर निश्चित करण्यात आली आहे.  
 
अशी गायब झाली होती मुलगी 
टेक्‍सासमधील रिचर्डसन सिटीतील घराबाहेरुन शेरीन 7 ऑक्‍टोबरला बेपत्ता झाली होती. शेरीन दूध पित नसल्यामुळे वेस्ले हे तिला पहाटे तीन वाजता घराबाहेर झाडाखाली उभे राहण्यास सांगितले. 15 मिनिटांनी तिला पाहण्यासाठी तो बाहेर आला असता, ती झाडाखाली नसल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे ही घटना घडून पाच तास उलटल्यानंतरही त्यांनी बेपत्ता असल्याची तक्रार दिली नाही.