1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 28 जून 2025 (21:25 IST)

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये विमान कोसळले, सर्व लोकांचा मृत्यू

मॉस्कोच्या कोलोम्ना जिल्ह्यात याक-१८टी प्रशिक्षण विमान कोसळले, त्यात सर्व ४ जणांचा मृत्यू झाला. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला. विमानाला उड्डाण करण्याची परवानगी नसल्याचीही चौकशी केली जात आहे.
मिळालेल्या माहितनुसार रशियाची राजधानी मॉस्कोच्या कोलोम्ना जिल्ह्यात शनिवारी एक दुःखद हवाई अपघात झाला, ज्यामध्ये प्रशिक्षण विमान याक-१८टी कोसळल्याने विमानातील ४ जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये क्रू मेंबर्स आणि प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा समावेश आहे. विमान एरोबॅटिक्सचा सराव करत असताना हा अपघात झाला. वृत्तानुसार, विमान अचानक नियंत्रणाबाहेर गेले आणि जमिनीवर कोसळले. तसेच सांगण्यात येत आहे की, विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात झाला. इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि कोलोम्ना येथील एका मोकळ्या मैदानात पडले असे सांगितले जात आहे. अपघातानंतर विमानाला आग लागली, ज्यामुळे विमानातील सर्व ४ जण जागीच ठार झाले.  
Edited By- Dhanashri Naik