शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (07:13 IST)

विजय मल्ल्याला झटका! लंडनमधील आलिशान घरातून बाहेर पडण्याची वेळ

ब्रिटनमधील एका न्यायालयाने मोठ्या कर्जाखाली दबलेल्या उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या लंडनमधील आलिशान घरातून बेदखल करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याचा अर्ज फेटाळला. स्विस बँक यूबीएससोबत दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर वादात मल्ल्याचे घर रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले होते.
 
या आदेशाचे पालन करण्यास स्थगिती देण्याची मागणी विजय मल्ल्या यांनी केली होती. परंतु लंडन उच्च न्यायालयाच्या चांसरी डिविजनचे न्यायाधीश मॅथ्यू मार्श यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की, मल्ल्या कुटुंबाला थकबाकी भरण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याचे कोणतेही कारण नाही. याचा अर्थ मल्ल्याला या मालमत्तेतून बेदखल केले जाऊ शकते. मल्ल्याला या स्विस बँकेचे 204 दशलक्ष पौंडांचे कर्ज परत करायचे आहे.
 
मल्ल्याची 95 वर्षीय आई लंडनमधील या घरात राहते. मल्ल्या मार्च 2016 मध्ये ब्रिटनला पळून गेला. तो 9,000 कोटी रुपयांच्या कर्जाचा गैरवापर आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी वांटेड आहे. मल्ल्या सध्या यूकेमध्ये जामिनावर बाहेर आहेत.