शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

विमान 42 हजार फूट उंचीवर असताना बाळाचा जन्म

तुर्किश एअरलाईन्सच्या विमानात सात महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेने विमानातच बाळाला जन्म दिला.

नफी दायाबी नामक महिलेने रविवारी तुर्किश एअरलाईन्सच्या विमानात मुलीला जन्म दिला. 28 आठवड्यांची गर्भवती असलेल्या नफीला विमानाने टेक ऑफ करताच प्रसुतिवेदना सुरु झाल्या. त्यानंतर विमानातील केबिन क्रू आणि काही प्रवाशांच्या मदतीने महिलेची प्रसुती करण्यात आली.

बाळाचा जन्म झाला त्यावेळी विमान 42 हजार फूट उंचीवर होतं. गिनिआची राजधानी असलेल्या कोनाक्री शहरातून विमानाने उड्डाण केलं होतं.