1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: नैरोबी , मंगळवार, 13 सप्टेंबर 2011 (12:28 IST)

केनियातील आगीत शंभर मृत्युमुखी

तेलनलिका फुटल्याने लागलेल्या आगीत केनियात शंभर जणांचा मृत्यू झाला. एका झोपडपट्टीजवळ असलेल्या तेलाच्या डेपोतून हे नागरिक तेलाची चोरी करताना नलिका फुटल्याने ही आग लागली.

तेलनलिका असलेल्या या परिसरात अनेक महत्त्वाची औद्योगिक केंद्रे आहेत. पोलिसांनी झोपडपट्टीतील नागरिकांना ताकीद देऊनही तेलाची चोरी केली जात आहे. अशी चोरी करतानाच नलिका फुटली व आग लागली. यात 102 नागरिक मरण पावल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, 2009 मध्ये देखील अशा एका घटनेत वीस हजार नागरिक बेघर झाले होते व दोघांचा मृत्यू झाला होता.