शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By दीपक खंडागळे|
Last Modified: कोलंबो , शनिवार, 2 फेब्रुवारी 2008 (22:16 IST)

श्रीलंकेत बसमध्ये बॉम्बस्फोट, 20 ठार

श्रीलंकेतील दामबुला शहरात आज एका प्रवासी बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 20 जण ठार झाले असून 50 जण जखमी झाले आहेत.

या स्फोटामागे लिट्टेचा हात असल्याचा दावा सेनाधिकारी ब्रिगेडीयर उदय नायनाकारा यांनी केला आहे. दामबुला शहर राजधानी कोलंबोपासून 150 किलोमीटरवर आहे. जखमींना उपचारासाठी सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.