सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified: अबुधाबी , गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (12:00 IST)

मुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विजय

मुंबई इंडियन्ससाठी हा विजय अविस्मरणीय असाच ठरला. कारण हा त्यांच्या या स्पर्धेतील पहिला विजय तर ठरलाच, पण युएईमधीलही त्यांचा हा पहिलाच विजय. या विजयासह मुंबईने आपले खाते उघडले आहे. रोहित शर्माची धडाकेबाज 80 धावांची खेळी आणि मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्या मुळे त्यांना केकेआरवर विजय साकारता आला.
 
मुंबईच्या 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरने सावध सुरुवात केली. केकेआरला शुभन गिलच्या रुपात पहिलाच धक्का बसला. त्यानंतर दुसरा सलामीवीर सुनील नरीनही झटपट बाद झाला. त्यामुळे कर्णधार दिनेश कार्तिक आणि नितीश राणा यांनी आपल्या खेळीला सावधपणे सुरुवात केली. या दोघांनी तिसर्यार विकेटसाठी 46 धावांची भागीदारी रचली. दिनेश कार्तिकला यावेळी 30 धावा करता आल्या, तर राणाने 24 धावा केल्या. त्यानंतर आंद्रे रसेल आणि इऑन मॉर्गन या दोघांना 16 षटकात जसप्रीत बुमराने बाद केल्याने केकेआरच्या विजाच्या आशा मावळल्या. आणि केकेआरचा 49 धावांनी पराभव झाला.