गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified: शारजाह , शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (10:50 IST)

राजस्थानची आज दिल्लीशी झुंज

लागोपाठ तीन सामन्यात पराभव पत्करल्यानंतर आपल्या त्रुटी सुधारणारा राजस्थान रॉयल्स संघ आज (शुक्रवारी) शारजाहच्या मैदानावर दिल्ली कॅपिटलशी कडवी झुंज देणार आहे.
 
दिल्लीने तीनही विभागात चांगली कामगिरी केली असून पाच पैकी चार सामने जिंकले आहेत. राजस्थान आतार्पंत आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन दाखवू शकलेला नाही. बेन स्टोक्सच आगनामुळे त्यांचा आशा उंचावल्या आहेत, परंतु तो 11 ऑक्टोबरपर्यंत क्वारंटाइनमध्ये आहे.
 
कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन बॅडपॅचमधून जात आहेत. संघातील भारतीय फलंदाज धावा बनवण्यात यशस्वी होताना दिसत नाहीत. कार्तिक त्यागी सोबत अंकित राजपूतचा समावेश केला परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. जयस्वाल भोपळा फोडण्यापूर्वीच बाद झाला तर राजपूतने तीन षटकांत 42 धावा दिल्या.
 
त्यागीने 36 धावा देऊन एक गडी बाद केला. जोस बटलर पुन्हा फॉर्मात आला असून ही राजस्थानसाठी शुभवार्ता आहे. गेल्या सामन्यात त्याने 44 चेंडूत 70 धावा ठोकल्या होत्या. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर आणि टॉम करन यांच्यावर दबाव आहे. मंदगती गोलंदाज राहुल तेवटिया सातत्याने अपयशी ठरत आहे.
 
दिल्लीचा संघ सर्वात मजबूत संघापैकी एक आहे. कर्णधार श्रेयस अय्यर चांगली कामगिरी करीत आहे. सलामी फलंदाज पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत हेदेखील फॉर्ममध्ये आहेत. मार्कस स्टोईनिस याने दोन अर्धशतके ठोकली आहेत. गोलंदाजीत कगिसो रबाडाने आतापर्यंत 12 बळी घेतले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरीच याने देखील गरज असेल तेव्हा चांगले प्रदर्शन केले आहे.
 
इशांत शर्माच्या जागी घेतलेला हर्षल पटेलने कोलकता नाइट रायडर्सविरुद्ध दोन गडी बाद केले परंतु गेल्या सामन्यात त्याने 43 धावा दिल्या. अंतिम मिश्राच्या जागी तंदुरुस्त होऊन आलेल्या अश्विनने 26 धावा देऊन एक गडी बाद केला होता.
सामन्याची वेळ
सायंकाळी 7.30 वाजता