बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: रविवार, 27 मार्च 2022 (12:54 IST)

DC Vs MI : दिल्ली काही खेळाडूं शिवाय सामन्यात उतरणार, प्लेइंग-11 जाणून घ्या

आयपीएल 2022 च्या पहिल्या डबल हेडरमध्ये मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. पाचवेळा चॅम्पियन मुंबई संघाची गेल्या हंगामातील कामगिरी विशेष राहिली नाही आणि हा संघ प्लेऑफपर्यंत पोहोचू शकला नाही.
 
अशा स्थितीत रोहित शर्माच्या संघाला स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे. तर,ऋषभ पंतच्या नेतृत्वा खालील दिल्ली कॅपिटल्स गेल्या हंगामात प्लेऑफमधून बाद झाले होते. अशा परिस्थितीत संघाला यंदाही आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवायला मेहनत करावी लागेल.
 
आकडेवारीनुसार, आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये मुंबई विरुद्ध दिल्ली आतापर्यंत 30 सामने खेळले गेले आहे. यापैकी मुंबईने 16 तर दिल्लीने 14 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत यंदाही दोघांमधील स्पर्धा रंजक असणार आहे. सध्या दिल्लीचा संघ मजबूत दिसत आहे, पण मुंबईला कमी लेखणे ही त्यांच्यासाठी मोठी चूक ठरेल.
 
मुंबईने कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन, किरॉन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराहसह आपली कोअर टीम कायम ठेवली असून या चौघांची कामगिरी या सामन्यात महत्त्वाची ठरणार आहे. सर्व फॉरमॅटमध्ये भारताचा नवा कर्णधार असलेल्या रोहितचे नेतृत्व आणि तांत्रिक पराक्रम सर्वाना माहित आहे. आता भारताचा भावी कर्णधार मानल्या जात असलेल्या कर्णधार म्हणून ऋषभ पंत दिल्लीसाठी कशी कामगिरी करतो हे पाहायचे आहे. स्फोटक फलंदाज पंतवर मुंबईला विशेष नजर ठेवावी लागणार आहे.
 
फिरकीसाठी अक्षरासह चायनामन गोलंदाज कुलदीप यादव सांभाळणार आहे. वेगवान आक्रमणाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा अॅनरिक नॉर्टजे करेल, त्याला मुस्तफिझूर रहमानची साथ असेल. मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग देखील युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीला आजमावू शकतात, जे स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे.
 
संभाव्य खेळी-11
मुंबई: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, डॅनियन सॅम्स/डेवाल्डे ब्रेविस, टिम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडेय.
 
दिल्ली:  पृथ्वी शॉ, टीम सेफर्ट, यश धुल, मनदीप सिंग, ऋषभ पंत (कॅण्ड विकेट), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, चेतन साकारिया.
 
दोन्ही संघ- 
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, बेसिल थंपी, हृतिक शोकीन, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, टायमल मिल्स, अर्शद खान, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, फॅबियन ऍलन, किरॉन पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयाल, इशान किशन.
 
दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार), अश्विन हेब्बार, डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, पृथ्वी शॉ, रोवमन पॉवेल, एनरिक नॉर्टजे, चेतन साकारिया, खलील अहमद, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विकी ओस्तवाल, यश धुल, केएस भरत, टिम सेफर्ट.