सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: सोमवार, 11 एप्रिल 2022 (21:29 IST)

IPL 2022 मिस्ट्री गर्लचा फोटो इंटरनेटवर व्हायरल

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये रविवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात सामना झाला. दिल्लीने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. पण सोशल मीडियावर मॅचबाहेरील एका मिस्ट्री गर्लची चर्चा रंगली, जी खेळादरम्यान काही काळ पडद्यावर दिसली. दिल्ली-कोलकाता सामन्यादरम्यान दिसणारा एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर चाहत्यांनी या मुलीला आयपीएल 2022 ची नवीन मिस्ट्री गर्ल घोषित केले आहे
 
दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज कुलदीप यादवने सामन्यात शानदार झेल घेतल्यानंतर, कॅमेरामनने या मिस्ट्री गर्लवर लक्ष केंद्रित केले आणि काही वेळाने स्क्रीनवर हा फोटो व्हायरल झाला.
 
ट्विटरवर लोकांनी पुन्हा एकदा कॅमेरामनचे आभार मानले. आणि मॅचपेक्षा कॅमेरामन सतत मिस्ट्री गर्लवर जास्त फोकस करत असल्याचे सांगितले. या मिस्ट्री गर्लचा फोटो वेगवेगळ्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.याआधी या हंगामच्या पहिल्या सामन्यातही एका मिस्ट्री गर्लचा फोटो व्हायरल झाला होता. सामन्यादरम्यान दिलेली प्रतिक्रिया लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि खळबळ उडाली.
 
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 215 धावांची मोठी धावसंख्या उभारली. दिल्लीसाठी डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉने अर्धशतक ठोकले आणि शेवटी शार्दुल ठाकूरने शानदार फिनिशिंग केले. त्याचवेळी कोलकाताला केवळ 171 धावा करता आल्या, दिल्लीकडून कुलदीप यादवने 35 धावांत 4 बळी घेतले.