शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

आज राजस्थान - केकेआर सामना

WD
आयपीएलच्या सहाव्या हंगामात शाहरूख खानच्या कोलकता नाईट रायडर्सने आणि शिल्पा शेट्टीच्या राजस्थान रॉयल संघाने साखळीतील पहिले सामने जिंकत आपली दावेदारी निश्चित केली असून, या दोन्ही विजयी संघामधला पहिला सामना आज जयपूरच्या स्टेडियमवर होत आहे. गत चॅम्पियन कोलकत्ता संघाने या वर्षीच्या हंगामात साखळीमध्ये पहिल्याच सामन्यात दिल्लीच्या संघावर आरामात सहा गडी राखून विजय मिळवत गत चॅम्पियन संघाला शोभेल अशी खेळी केलेली आहे. आयपीएलच्या हंगामाची सुरुवात करणा-या पहिल्या सामन्यात अत्यंत कमी मानली जाणारा धावसंख्या तर राजस्थान रॉयल्र्सने आपला पहिला सामना ५ धावांनी जिंकत या स्पर्धेत आपला संघही विजयाचा दावेदार असल्याचे सिद्ध केले आहे. जयपूरच्या स्टेडियमवर गतवर्षी झालेल्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्र्सने केकेआरचा २२ धावांनी पराभव केला होता. त्याचा बदला घेण्याची संधी केकेआरला आजच्या निमित्ताने मिळणार आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहूल द्रविडने ५१ चेंडूंत ६२ धावा करीत प्रतिस्पध्र्यावर दबाव निर्माण केला होता.स्ट्राबिन्नीने वीस चेंडूत ४० धावा केल्या होत्या.