Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 12 मार्च 2010 (15:06 IST)
आयपीएलमध्ये चित्रपटाच्या सेटची कमतरता
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रहस्य, रोमहर्षकता, नृत्य, आनंद, दु:ख, हसणे, रडणे सर्वकाही आहे. बॉलिवूडचा तडकाही या स्पर्धेत मिळतो. परंतु चित्रपटाच्या सेटची कमतरता यामध्ये जाणवते, अशी खंत किंग्स इलेवन पंजाबची मालकीन प्रीती झिंटा हिने व्यक्त केले.
आयपीएलमधील आपल्या संघाचा उत्साह वाढविण्यासाठी प्रीतीने कमी चित्रपट स्वीकारले आहे. तसेच दीर्घ काळ चित्रपटाच्या सेटपासूनही ती लांब आहे. ती म्हणाली,' जेव्हा माझा संघ खेळत असतो तेव्हा मी चित्रपटाची शुटींग करु शकत नाही. आयपीएलमध्ये माझी खूप मोठी गुंतवणूक आहे. परंतु आयपीएलमध्ये व्यस्त झाल्यामुळे चित्रपटाची सेटची कमतरता मला जाणवत राहते. यामुळे आयपीएलनंतर मी चित्रपटात काम करणार आहे.