शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनराझर्स हैदराबाद

WD
यजमान किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनराझर्स हैदराबाद या संघात सहाव्या आयपीएल स्पर्धेतील 59 वा ट्वेंटी-20 साखळी क्रिकेट सामना खेळला जात आहे. प्ले ऑफ फेरीसाठी या दोन्ही संघाला विजय आवश्क आहे.

बारा सामन्यातून सनराझर्सने सात विजय व चौदा गुणांसह साखळी गुणतक्त्यात पाचवे स्थान घेतलेले आहे. तर पंजाब संघ 5 विजय 10 गुणांसह सहाव्या स्थानांवर आहे. दोन्ही संघाला विजय आवश्यक आहेत. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होण्याची जास्त शक्यता आहे. हैदराबाद संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर बरेच विजय मिळविले आहेत. त्यामुळे त्यांना आता मोहालीच्या मैदानावर खेळावे लागणार आहे.

चेन्नईने हैदराबादचा 77 धावांनी पराभव केला होता. तत्पूर्वी, हैदराबादने मुंबई, बंगळुरू अशा संघांना घरच्या मैदानावर पराभवाची चव चाखवली होती. चेन्नईविरुद्ध मात्र पार्थिव पटेल (44) आणि करन शर्मा (39) या दोघांनीच फक्त चेन्नईच्या गोलंदाजांचा प्रतिकार केला होता. शिखर धवन या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही.

हैदराबादची ताकद गोलंदाजीत आहेत. वेगवान गोलंदाज डेल स्टेन, इशांत शर्मा, फिरकी गोलंदाज अमित मिश्रा आणि श्रीलंकेचा अष्टपैलू थिस्सारा परेरा हे उत्तम गोलंदाज संघात आहेत. मोहालीची खेळपट्टी ही गोलंदाजीला अनुकूल अशीच असते. परंतु, मागच्या सामन्यात ही खेळपट्टी मंद आणि कोरडी अशी होती. याउलट, पंजाबकडेही चांगले फलंदाज व गोलंदाज आहेत. त्यांचा संघही संतुलित आहे.