चेन्नईचा संपूर्ण संघ आफ्रिकेला जाणार
इंडियन प्रीमियल लीगसाठी (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्सचा 27 खेळाडूंचा संपूर्ण संघ दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. आयपीएल 18 एप्रिलपासून सुरु होणार आहे. सुपर किंग्सच्या निवड समितीचे अध्यक्ष वी.बी.चंद्रशेखर यांनी सांगितले की, सर्वोच्च कामगिरीसाठी आम्ही कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. यामुळे सर्व 27 खेळाडूंना आम्ही आफ्रिकेला घेवून जाणार आहोत. यामुळे स्पर्धे दरम्यान कोणत्याही खेळाडूस दुखापत झाली तर लगलेच दुसर्या खेळाडूचा संघात समावेश करता येईल. संघ बुधवारी आफ्रिकेला रवाना होणार आहे. यामुळे तेथील परिस्थितीशी संघाला जुळवून घेता येईल.