शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

पंजाबचे दिल्लीसमोर 105 धावाचे आव्हान

पाऊस व अपूर्‍या प्रकाशामुळे दिल्ली डेयर डेविल्स व किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्या इंडियन प्रिमियर लीगचा सामना तब्बल दीड तास उशीरा सुरू झाला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 12 षटकात 7 गडी गमावून 104 धावा केल्या.

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची सुरवात चांगली झाली परंतु सलामीवीर रवी बोपारा व एस गोयल तंबूत परतल्यानंतर उरलेले फलंदाज एका मागे एक तंबूत परतले.

रवी बोपारा (22), एस गोयल (38), कुमार संगकारा (8), कर्णधार युवराजसिंग(16), माहेला जयवर्धने (6) आदी खेळाडू तंबूत परतल्यानंतर पीयूष चावला खाते न उघडताच तंबूत परतला. इरफान पठान हा देखील 6 धावा करून झेलबाद झाला. डेनियल व्हिटोरीने 3 षटकात 15 धावा देऊन 3 गडी बाद केले.