शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

पावसाचा प्रसाद, सामना दिल्लीच्या खिशात‍‍

दिल्ली डेयर डेविल्सचा किंग्स इलेव्हनवर विजय

पाऊस व अंधूक प्रकाशामुळे दिल्ली डेयर डेविल्स विरूध्द किंग्स इलेव्हन पंजाब सामना कधी चालत तर कधी थांबत एकदाचा संपला व पावसाचा कृपाप्रसाद लाभलेल्या दिल्ली डेयर डेविल्सने 10 गडी राखून किंग्ज इलेव्हनवर विजय मिळवून सामना खिशात घातला.

किंग्ज इलेव्हन पंजाबने ठेवलेल्या १०५ धावांचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीची वीरू-गंभीर ही सलामी जोडी मैदानात उतरली. परंतु पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणून सामना थांबवला. त्यानंतर सामना सहा षटकांचा करण्यात आला व दिल्लीसमोर ५४ धावाचे आव्हान ठेवण्यात आले. परंतु सेहवाग व गंभीर या जोडीने अवघ्या 4.5 षटकातच ते अगदी सहज पूर्ण करून टाकले. वीरेंद्र सेहवागने विजयी षटकार लावून सामन्याला विराम दिला. चार चौकार व 3 षटकारच्या जोरावर सेहवागने 38 धावा व गंभीरने 16 धावा करून नाबाद राहिला. डेनियव्हिटोरीने 3 गडबाकेल्यानत्यालसामनावीपुरस्कामिळाला.