मुंबई इंडियन्ससमोर 'चेन्नई'चे आव्हान

dhoni
चेन्नई| वेबदुनिया|
WD
ख्रिस गेलने वादळी फलंदाजी केली, तरी विजयाची संधी हातची गमावलेल्या मुंबई इंडियन्ससमोर उद्या (शनिवारी) चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असेल. गतवर्षी विजेतेपदाची हॅट्ट्रिक हुकलेला महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई संघ यंदा विजयाने आपली मोहीम सुरू करण्यास उत्सुक असताना मुंबई इंडियन्सला कामगिरी उंचावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

गतवर्षी विजेतेपदाची हॅट्ट्रिक हुकणाऱ्या चेन्नई संघाची ताकद मजबूत आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचविणारे आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा चेन्नई संघात आहेत. त्यामुळे अश्‍विन आणि जडेजा मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना बेजार करू शकतील. चेन्नईच्या फलंदाजीचा विचार करता फॉर्मात असलेला मुरली विजय, महेंद्रसिंह धोनी यांच्या जोडीला झटपट क्रिकेटचा "स्पेशालिस्ट' सुरेश रैना आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला माईक हसीमधील आक्रमकपणा अजूनही संपलेला नसेल. कालच्या सामन्यात एकटा गेल मुंबई इंडियन्सला भारी पडला होता. उद्या किमान तीन-चार फलंदाज मुंबई इंडियन्सला भारी पडू शकतात.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५
देशात कोरोनाने दोन जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या 19 झाली आहे २०० हून अधिक रुग्ण ...

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता
महाराष्ट्रात अद्यापही केव्हाही पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. आज, २९ मार्च ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर
कोरोनाशी लढा देण्यासाठी उद्योग जगताकडूनही मोठा आर्थिक हातभार लागत आहे. काही कलाकारांनीही ...

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य
येत्या आठवड्यापासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट ची सोय उपलब्ध असणार आहे. ...

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी
सध्या भारतात कोरोनाचे संकट गडद होऊ लागले आहे. शनिवारी देशभरात एकूण कोरोनाग्रस्त रुग्नांची ...