शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

वीरूच्‍या वीरांनी धोनीच्‍या धुरंधरांना लोळविले

धुरंधर फलंदाजांच्‍या दिल्‍ली डेअर डेव्‍हील्‍सने माहीच्‍या चेन्‍नई सुपर किंग्जचा अत्यंत चुरशीच्‍या सामन्‍यात शेवटच्‍या षटकात नऊ धावांनी पराभव केला असून दिल्‍लीने या मालिकेतील आपला दुसरा विजय तर चेन्नईचा दुसरा पराभव स्‍वीकारावा लागला आहे. दिल्ली डेअर डेव्‍हील्सने दिलेल्‍या 190 धावांच्‍या आव्‍हानाचा सामना करताना चेन्नई सुपर किंग्स निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 180 धावांवर बाद झाला.

चेन्नईकडून हेडनने 27 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकार ठोकून 57 धावा केल्‍या. संघाच्‍या 90 धावा झाल्‍या असताना हेडन बाद झाला. त्‍याने आयपीएलमधील दुसरे सर्वाधिक वेगवान अर्धशतक ठोकले. केवळ 22 चेंडूत त्याने 50 धावा केल्‍या. सुरेश रैनानेही 27 चेंडूत पाच चौकार आणि एक षटकार ठोकून 41 धावा केल्‍या. मात्र त्‍यानंतर कुठलाही फलंदाज फार काळ मैदानावर टिकून राहू शकला नाही. सलामीवीर पार्थिव पटेल 16 तर धोनी 5 धावा करून बाद झाले. आजच्‍या सामन्‍यात दोन्‍ही संघांचे कर्णधार वैयक्तीक खेळात मात्र अपयशी ठरले.

अखेरच्‍या षटकांमध्‍ये वेगवान घडामोडींमध्‍ये संघाचे चार फलंदाज धावबाद झाले. त्‍यामुळे विजय संघापासून दूर-दूर गेल्‍याने त्‍यांना पराभव पत्‍करावा लागला.

सामन्‍याच्‍या लाईव्‍ह मराठी स्‍कोरकार्डसाठी येथे क्लिक करा...

तत्पूर्वी दिलशान तिलकरत्‍नेच्‍या अर्धशतकी खेळी आणि डिव्‍हीलियर्सची धमाकेदार शतकी खेळीच्‍या बळावर दिल्‍ली डेअर डेव्‍हील्‍सने धोनीच्‍या चेन्नई सुपर किंग्ज समोर विजयासाठी 190 धावांचे आव्‍हान ठेवले. सलामीचे फलंदाज गौतम गंभीर आणि कर्णधार सेहवागकडून आज फलंदाजीत फारशी चुणूक दाखवू शकले नाहीत.

दिल्ली आणि चेन्नई संघातील आजचा सामना हा या टुर्नामेंटमधील नववा सामना होता. या सामन्‍याकडे धोनी विरुध्‍द वीरू असे म्हणूनच पाहिले जात होते.

दिल्‍ली संघाचा कर्णधार सेहवागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्‍याच्‍या सुरूवातीलाच सलामीचा फलंदाज म्हणून मैदानात उतरलेला गौतम गंभीर लक्ष्‍मीपती बालाजीच्‍या गोलंदाजीवर पहिल्‍याच चेंडूवर बाद होऊन परतला. त्‍या पाठोपाठ मैदानात उतरलेला वीरेंद्र सेहवागही सहा धावांवर बाद झाला.

आघाडीच्‍या फलंदाजांनी निराशा केल्‍यानंतर मैदानावर उतरलेला मधल्‍या फळीतील फलंदाज दिलशान तिलकरत्ने धडाकेबाज फलंदाजी करताना 27 चेंडूत 50 धावा केल्‍या. या दरम्‍यान त्‍याने 7 चौकार आणि दोन उत्तुंग षटकार ठोकले. मात्र अर्धशतक पूर्ण केल्‍यानंतर लगेचच अलबाई मॉरेकलच्‍या गोलंदाजीवर सुरेश रैनाकडे झेल सोपवून तो बाद झाला. त्‍यानंतर दिनेश कार्तिक 16 चेंडूंवर 18 धावा करून अँड्र्यू फ्लिंटॉफकडून बालाजीच्‍या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

दुस-या बाजूने अब्राहम डिव्‍हीलर्सने जबाबदार पूर्ण शतकी खेळी केली. यंदाच्‍या टुर्नामेंटमधील हे पहिले शतक आहे. त्‍याने 54 चेंडूत 105 धावा केल्‍या. त्‍यात 5 चौकार व सहा षटकारांचा समावेश आहे.