शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|
Last Modified: बुधवार, 22 मे 2013 (09:57 IST)

श्रीसंथची गर्लफ्रेंड साक्षीची मैत्रीण

FILE
नवी दिल्ली. आयपीएल स्पॉट फिक्सिंग मध्ये दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या श्रीसंथची गर्लफ्रेंड व महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी चांगल्या मैत्रिणी आहेत. फिक्सिंग कांडात या खुलाशानंतर पोलिस साक्षीसही विचारपूस करण्याची शक्यता बळावली आहे.

राजस्थान रॉयल्सच्या श्रीसंथने आपल्या या गर्लफ्रेंडला 42 हजार रूपयांचा ब्लॅकबेरी भेट दिला होता. 15 मे रोजी झालेल्या सामन्याअगोदर त्याने 1 लाख 95 हजार रूपयांची कपड्यांची खरेदीही केली होती.

साक्षी व श्रीसंथची गर्लफ्रेंड अगोदरच्याच मैत्रिणी असून त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण सोबत घेतले आहे.