शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By भाषा|

'राजस्थानच्या विजयाचे रहस्य'

मुंबईतील डी वाय पाटील मैदानावर आयपीएल मालिकांचे पहिले विजेतेपद पटकावणार्‍या राजस्थान संघाचा कर्णधार शेन वॉर्न याने विजयाचे सारे श्रेय संघातील युवा खेळाडूंना दिले आहे.

आपल्या आयुष्यात खेळल्या गेलेल्या काही महत्त्वाच्या मालिकांपैकी आयपीएल मालिका असल्याचे तो म्हणाला. संघातील खेळाडूंमधीलएकरुपता, परस्परांवरील विश्वास आणि दृढ निश्चय या बळावरच राजस्थानने प्रत्येक सामना जिंकल्याचे त्याने स्पष्ट केले.

संघातील तरुण आणी नवख्या म्हणवल्या गेलेल्या स्वप्नील, रवींद्र, जडेजा, आणि युसुफ पठाण यांनी अप्रतिमच कामगिरी केल्याचे कौतुकही वॉर्नने केले.

अखेरच्या षटकात कोणत्याही स्वरूपाचा दबाव सोहेल तन्वीर आणि त्याच्यावर नसल्याचे स्पष्ट करत आमच्या डोळ्यापुढे केवळ आयपीएल ट्रॉफीच दिसत असल्याचे त्याने स्पष्ट केले.

तरुण खेळाडूंमधील उत्साह, त्यांचा जिगरबाज खेळ आणि विजय खेचून आणण्याची ताकत हे राजस्थान संघाच्या विजयाचे रहस्य असल्याचे वॉर्नने स्पष्ट केले.