शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|
Last Modified: गुरूवार, 25 एप्रिल 2013 (16:04 IST)

क्रिकेटपटूंच्या भेदक मार्‍याने तरुणींची दांडी गुल

FILE
नवी दिल्ली. क्रिकेटमध्ये नाइटवॉचमन टर्मचा अर्थ काय व त्याची भूमिका काय? आपणास सुपर ओव्हर विषयी माहिती आहे? सौंदर्य, बुद्धिमत्ता व संपत्ती यामधून पहिले प्राधान्य कशास व शेवटचे प्राधान्य कशाला देशील?

आतापर्यंत सौंदर्यवतींच्या अदांच्या क्रिकेटपटू घायाळ झाल्याचे आपण नेहमीच ऐकता मात्र बुधवारी रात्री दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या क्रिकेटपटूंच्या भेदक प्रश्नांच्या मार्‍याने सौंदर्यवतींची चांगलीच भंबेरी उडाली. निमित्त होते निसान फेस ऑफ द दिल्ली डेअरडेव्हिल्स स्पर्धेच्या अंतिम फेरीचे.

वॉर्नर ने असे काय विचारले की सौंदर्यवती बावरली...

FILE
अंतिम फेरीत प्रश्न विचारण्याची जबाबदारी डेव्हिड वॉर्नर, इरफान पठाण, आशिष नेहरा, आंद्रे रसेल,रिलोफ वान डेर मर्व आणि प्रशिक्षक एरिक सिमन्स यांच्यावर होती. प्रश्न विचारणे आणि प्रश्नांच्या सरबत्तीने पाचही मॉडेल्सना गोंधळात टाकण्यात वॉर्नर ने बाजी मारली.

शतकातील महिलेत कोणते तीन गुण असायला पाहिजे, असा सवाल वॉर्नरने डागला. या प्रश्नाने एकीला चांगलेच गोंधळात टाकले आणि नाइटवाचमन काय आहे आणि तो काय काम करतो, असा प्रश्न दुसर्‍या स्पर्धकास विचारल्याबरोबर ती एकदम लाजलीच. ती म्हणाली मला माहीत नाहीये आणि मी फक्त सचिनची फॅन आहे.

मर्वच्या प्रश्नाचे उत्तर देऊन विजेतेपद पटकावले या स्पर्धकाने....

FILE
वान डेर मर्वचा पहिला प्रश्न धारदार व थेट होता. त्याने विचारले आपणासाठी लग्न व प्रेम यामध्ये काय महत्त्वपूर्ण आहे? स्पर्धक सिखाने या प्रश्नाचे इतके सुरेख उत्तर दिले की संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजून उठला. अखेर सिखाच निसान फेस ऑफ द डेअरडेव्हिल्स ठरली.

प्रश्न विचारण्यात परदेशी खेळाडू आघाडीवर होते तर मॉडेल्स मध्ये इरफान पठाणची चांगलीच चलती होती. पठाणनेही आपल्या बाउंसरने घायाळ केले मात्र दोन स्पर्धकांनी आवडत्या क्रिकेटपटू म्हणून त्याचीच निवड केली.

खुशी म्हणाली की मी फक्त पठाणसाठी क्रिकेट बघते. याअगोदर खेळाडूंनी क्रिकेटव्यतिरिक्त आपल्या आवडी-निवडींवरही प्रकाश टाकला. आंद्रे रसेलच्या गगनम स्टाइलने चांगल्याच टाळ्या हासील केल्या.