शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

गतविजेत्‍या राजस्‍थानचा लाजीरवाणा पराभव

विजयासाठी 134 धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेला गतविजेता राजस्थान रॉयल्सचा संघाची सुरुवात आणि शेवटही चांगला होऊ शकला नाही अवघ्‍या 28 धावांवर पाच गडी गमावल्‍यानंतर राजस्थान रॉयल्सचे सर्व फलंदाज अवघ्‍या 58 धावांवर तंबूत परतले. त्‍यामुळे बंगळुरूने राजस्‍थानवर 75 धावांचा धडाकेबाज विजय संपादन केला आहे.

भारताच्‍या महान स्पिनर अनिल कुंबळेच्‍या घातक गोलंदाजीने पाच धावांवर पाच गडी बाद करून आणि जेसी रायडरच्‍या भेदक गोलंदाजी आणि राहुल द्रविडच्‍या 66 धावांच्‍या मदतीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दूस-या आयपीएलच्‍या पहिल्‍या दिवशी गतविजेत्या राजस्थान रॉयल्सला 58 धावांवर पराभूत केले आहे.

तत्‍पूर्वी बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला आलेले जेसी रायडर आणि रॉस टेलर शून्यावर बाद झाले. त्यानंतर आलेला धडाकेबाज फलंदाज रॉबीन उथप्पाही तीन धावांवर बाद झाल्याने बंगळुरू रॉयल्‍सची अवस्था तीन बाद 17 झाली. त्‍यानंतर आलेला कर्णधार केवीन पीटरसनही 32 धावा करून बाद झाला. माजी कर्णधार राहुल द्रविडने संघाचा खेळ सावरत 48 चेंडूत 66 धावा करून एक बाजू लावून धरली. तर दुस-या बाजूला आलेले फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहीले. त्‍यामुळे रॉयल चॅलेंजर्सने 20 षटकात आठ बाद 133 धावा केल्या.