डेक्कनचा सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड
इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या टूर्नामेंटमध्ये सातत्याने अपयशी ठरलेल्या डेक्कन चार्जर्स टीमने बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स विरोधात आपल्या दुस-या सामन्यात 12 षटकार ठोकून या ट्वेंटी-20 लीगमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड केला आहे. चार्जर्स टीम आतापर्यंत 108 षटकार ठोकले असून पंजाबने 106 षटकार ठोकले आहेत. या सामन्यात चार्जर्सचा कर्णधार एडम गिलख्रिस्ट आणि रॉयल चॅलेंजर्सचा माजी कर्णधार राहुल द्रविडने आयपीएलमध्ये 500 धावांचा आकडा पार करणारा फलंदाज ठरला आहे.