द्रविडला 20 हजार डॉलर्सचा दंड
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने निर्धारित वेळेत षटके न टाकल्याबद्दल या संघाचा कर्णधार राहुल द्रविडला 20 हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या सहाव्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सदरम्यान सोमवारी सामना झाला. त्यावेळी राजस्थान रॉयल्सने निर्धारित वेळेत ठरलेल्या षटकांपेक्षा दोन षटके कमी टाकली होती. षटकांची सरासरी न राखल्याबद्दल संघाचा कर्णधार म्हणून द्रविडला दंड करण्यात आला आहे. आयपीएलच्या सहाव्या सत्रात राजस्थान रॉयल्स संघाला पहिल्यांदाच अशा प्रकारच्या दंडाला सामोरे जावे लगले आहे. या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सने 19 धावांनी विजय मिळविला असून, आयपीएलमध्ये सलग दुसरा विजय आहे.