धोनी-सेहवाग आज सामने-सामने
आयपीएलच्या सहाव्या दिवशी आज डरबनच्या किंग्समीड स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली डेअर डेविल्सचे संघ समोरा-समोर उभे राहणार आहेत. तर दुसरीकडे केपटाउनच्या न्यूलँड्स मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट राइर्ड्स यांच्यात लढत रंगणार आहे. सुपर किंग्स आणि डेअर डेव्हील्स यांच्यातील सामना सर्वच पातळीवर जोरदार होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी चार वाजेपासून होणा-या या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दोन्ही संघात धुरंधर खेळाडूंचा भरणा असून त्यामुळे सामना रोचक होण्याची शक्यता आहे.