शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

नाइट रायडर्स 101 धावात 'ऑलआउट'

आयपीएलच्या दुस-या दिवशीच्या दुस-या सामन्यासाठी कोलकता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेऊन मैदानावर उतरले. परंतु ढेपाळलेला नाइट रायडर्सचा संघ 101 धावावरच गारद झाला.

कर्णधार ब्रेंन्डन मॅकलमच्या कोलकता नाइट राइडर्सची सुरवात फारच निराशा जनक ठरली. 16 धावावर तीन गडी एका मागे तंबूत परतले.

कर्णधार मॅकलम (1) आरपीसिंगच्या चेंडूवर यष्टीरक्षक एडम गिलक्रिस्टकडून झेलबाद झाला. क्रिस गेल ही (10) क्रीजवर जास्त वेळ टिकू शकला नाही. आरपीसिंगनेच त्याला बाद केले.

'बंगाल टाइगर'ने ही क्रिक्रेटप्रेमींना निराश केले. सौरव गांगुलीला (1) हरमीतसिंगच्या चेंडूवर लक्ष्मणने झेलबाद केले. बाद में ब्रेड हॉज (31) डाव संभळला, परंतु त्याला इतर रायडर्सची साथ न लाभल्याने 19.4 षटकात 101 धावावर सर्वबाद झाला. डेक्कन चार्जर्स कडून भेदक गोलंदाजी करून आरपीसिंगने चार गडी बाद केले