शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वार्ता|

रोहितमध्‍ये कर्णधार बनण्‍याची क्षमताः गिलख्रिस्ट

रोहित शर्मा एक प्रतिभावंत खेळाडू असून त्‍यात भविष्यातील कर्णधार बनण्‍याची क्षमता आहे, असे मत हैदराबाद संघाचा कर्णधार एडम गिलख्रिस्ट याने व्‍यक्त केले आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्‍या (आयपीएल) दुस-या टप्‍प्‍याच्‍या खेळात हैदराबादने बंगळुरूचा 24 धावांनी पराभव केला होता. या सामन्‍यात रोहितने 30 चेंडूत 52 धावांची खेळी केली होती. त्‍यात त्‍याने अनिल कुंबळेच्‍या एकाच षटकात तीन षटकार ठोकले होते.