शेन वार्न खेळण्यासाठी उतावीळ
ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वार्नला क्रिकेटमधून विश्रांती दिल्यानंतर ही पूर्णपणे फिट असून येत्या 18 एप्रिल पासून दक्षिण आफ्रिकेत सुरू होणार्या आयपीएलच्या मालिकेते खेळण्यासाठी उतावीळ झाला आहे. आयपीएलचा गत विजेता राजस्थान रॉयल्सचे वार्न नेतृत्त्व करणार आहे. राजस्थान रॉयल्सचे उपाध्यक्ष रंजीत बी यांनी सांगितले की, संघ यंदा ही विजयाची मालिका कायम ठेवणार आहे. राजस्थान रॉयल्सचे खेळाडू दोन टप्प्यात 7 एप्रिलला दक्षिण आफ्रिकेत पोहचतील. राजस्थान रॉयल्स संघ 11 एप्रिलला दक्षिण आफ्रिकी स्टॅडर्ड बॅंक प्रो-20 चॅम्पियन्स संघाला सामोरे जाईल.