मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 6 जून 2015 (11:48 IST)

एक असं शहर.. जिथे एक ट्विट टाका आणि सेवा तुमच्या दारात

आजकाल कुठेही जा, तंत्रज्ञान काही तुमची पाठ सोडत नाही. आपलं अवघं आयुष्यच व्हॉटस् अँप, ट्विटर, फेसबुकने व्यापलं आहे. मात्र आपली दैनंदिन कामंही ट्विटरच्या माध्यमातून व्हायला लागली तर?
 
स्पेनमधल्या जुन या छोटय़ाशा शहरात ट्विटरच्या माध्यमातूनच सर्व स्थानिक सुविधा पुरवल्या जातात. अगदी सफाई कर्म कर्मचार्‍यापासून पोलिसापर्यंत, कोणालाही बोलवायचं झालं तर ट्विट टाकूनच बोलवायचं. तुमची तक्रार, सूचना किंवा कुठलीही माहिती मागवायची असेल तर तुम्हाला 140 अक्षरांच्या मर्यादेतला ट्विट टाकण्यावाचून पर्याय नाही.
 
या शहराची लोकसंख्या 3500. शहराच्या प्रमुखांच्या मते ट्विटरचा आधार घेतल्यामुळे स्थानिकांना मोठा फायदा झाला आहे. पहिलं म्हणजे कर्मचार्‍यांनी केलेलं काम प्रत्यक्ष दिसून येतं. त्यामुळे त्यांचा शासकीय कामात सहभागही वाढला आहे. यापूर्वी रस्त्याची साफसफाई करणार्‍या कर्मचार्‍याच्या कामाची दखल घेतली जात नसे, मात्र आता त्यालाही मान मिळतो. पर्यायाने कर्मचारी आणि नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे छोटी लोकसंख्या असलेल्या जुन शहराच्या प्रमुखांचे फॉलोअर्स लोकवस्तीच्या शंभरपट म्हणजे 3 लाख 396 हजाराच्या घरात आहेत. आगामी काळातील पावसाचा इशाराही ट्विटरवरुन दिला जातो आणि आगीपासून दक्ष राहण्याची सूचनाही.
 
यापूर्वी मोबाइल फोन सतत खणखणत असायचा, मात्र आता मी वेळ मिळेल तसा प्रत्येक समस्येकडे लक्ष देऊ शकतो. आतापर्यंत 1 लाख 18 हजार 266 समस्यांचा निपटारा केला आहे, सरासरी दरदिवशी 81 समस्या या वेगाने जुन शहराचं अनुकरण इतर शहरांनी केल्यास लवकरच हॅशटॅगही लोकांच्या तोंडी रुजतील यात शंका नाही.