1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 26 नोव्हेंबर 2015 (11:25 IST)

‘वाय-फाय’पेक्षा ‘लाय-फाय’चा वेग 100 पट अधिक

तुम्ही बटन दाबले आणि तीन तासांचा चित्रपट एका क्षणात डाउनलोड झाला तर? होय, आता हे शक्य आहे. कारण आता ‘वाय फाय’ची जागा लाय-फाय हे तंत्रज्ञान घेणार असून याचा वेग वाय-फायपेक्षा 100 पट अधिक आहे. या माध्यमातून 1 जीबी डाटा ट्रान्समीट करण्यासाठी अवघा एक सेकंद वेळ लागतो. प्रायोगिक तत्त्वावर लाय-फायची गती दिसून आली असून त्याचा हेतू साध्य झाला आहे. या तंत्राचे नाव लाय-फाय (लाइट फिडॅलिटी) आहे. या तंत्राच्या कक्षेत येणार्‍या प्रत्येक गॅझेटवर इंटरनेट अँक्सेस देणे शक्य आहे. 
 
हे वाय-फायपेक्षा खूप सुरक्षित आहे कारण त्याची रेंज भिंतीच्या पलीकडे जाऊ शकत नाही. मोठ्या कार्यालयांसाठी माहितीचे वहन करणे सोपे होईल. वाय-फायला सक्षम पर्याय म्हणून लाय-फाय आहे.- त्याचा वेगही जबरदस्त आहे. एलईडीद्वारे डेटा वहन करण्यात येईल.- डेटा ट्रान्सफरिंगचे माध्यमच लाइट असल्याने सिग्नल्स हॅक करण्याचा धोका यात नाही. वेल्मेनी कंपनीचे सीईओ दीपक सोळंकी म्हणाले, आता याचा पर्याय शोधणे कुणालाही शक्य होणार नाही. प्रकाशाच्या वेगामुळे याचा वेगही वायर्ड वाय -फायपेक्षा जास्त आहे. 
 
डेटा ट्रान्सफरिंगचे माध्यमच लाइट असल्याने सिग्नल्स हॅक करण्याचा धोका यात नाही. रुग्णालयांसाठी तर हे तंत्र वरदानच ठरेल. येथे इंटरनेट सिग्नल्समध्ये बाधा कमी येतील. हे तंत्रज्ञान फारसे खर्चिक नसून 100 पटीने अधिक गतिशील आहे. अँडिनबर्ग युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ हेराल्ड हास यांच्या टीमने एका कंपनीच्या मदतीने प्लग अँड प्ले अँप्लिकेशन लॉन्च केले आहे. 
 
फ्रान्ची ओलेडकॉमने लाय-फाय टेक्निक हॉस्पिटल्समध्ये लावणे सुरू केले आहे.