संबंधित माहिती
- OPPO F17 हे OPPO च्या शृंखलांमधील फोन 2 सेप्टेंबरला लॉन्च करण्यात येणार आहेत. काय असणार स्पेक्स (फीचर्स) जाणून घेऊ या...
- पॉलिटेक्निकच्या ऑनलाईन प्रवेशासाठी 15 दिवसांची मुदतवाढ
- मनसेने केलेल्या सर्व्हेचा कौल म्हणतो, लॉकडाऊन हटवावा
- नोकियानेही मीडिया स्ट्रीमिंग डिव्हाइस आणले
- काय म्हणता, पाच रूपयांचं सोनं खरेदी करता येणार
अॅपल लव्हर्ससाठी आनंदाची बातमी, अॅपल लवकरच भारतात ऑनलाइन स्टोअर सुरू करणार
अॅपल ही कंपनी लवकरच भारतात आपलं ऑनलाइन स्टोअर सुरू करणार आहे. माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार अॅपल सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान भारतात आपलं ऑनलाइन स्टोअर सुरू करण्याच्या विचारात आहे. पुढील काही महिन्यांमध्ये येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर कंपनीनं ऑनलाइन स्टोअर लाँच करण्याचा विचार केला असल्याचं म्हटलं जात आहे.
सध्या अॅपल भारतात थर्ड पार्टी विक्रेते तसंच अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या मोबाइल फोनची विक्री करते. सरकारनं गेल्यावर्षी सिंगल ब्रँड रिटेलला प्रोत्साहन देत थेट परदेशी गुंतवणुकीशी निगडीत मार्गदर्शक सुचनांमध्ये थोडी सुट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कंपन्यांना लोकल सोर्सिंगच्या नियमांमध्ये थोडा दिलासा मिळाला होता.
